कधी कधी
जुनी डायरी उघडताच, आतून डोकाऊन बघतेस
वर मन करताच, दूर निघून गेलेली असतेस.
कधी कधी,
चांदण्या रात्री, मागून येऊन डोळे घट्ट मिटते
आणि उघडायचा प्रयत्न करताच, सकाळ झालेली असते.
कधी कधी,
दूरच्या प्रवासात, अचानक बाजूला येऊन बसते
हात हातात घेताच, सीट रिकामीच भासते.
कधी कधी,
समुद्र लहारीन्प्रमाणे, किनारी बागडताना दिसतेस
जवळ जाताच लाटांप्रमाणे निघून गेलेली असतेस.
कधी कधी,
स्वप्नांमध्ये हि येते, घट्ट मिठी मारते
ती मिठी सोडवताना मात्र, उशीच फाटलेली असते.
कधी कधी
कधी कधीच कशाला तू तर नेहमीच बरोबर असते
....................., माझ्या मनात कायमचीच वसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा