शुक्रवार, २० जुलै, २०१२
शनिवार, १४ जुलै, २०१२
भर पावसात...
परत एकदा पावसात भिजावेसे वाटते आहे.जुन्या गोष्टी परत करावेसे वाटते आहे.
शाळेचा उनिफोर्म घालून,
चिखलातून धावत जावेसे वाटते आहे.
कॉलेज च्या मित्रांबरोबर मस्ती करत,
परत एकदा भिजत घरी यावेसे वाटते आहे.
तिच्या बरोबर भर पावसात,
परत फिरावेसे वाटते आहे.
कमरे एवढ्या पाण्यात एकमेकांना सावरत,
परत एकदा तिच्या बरोबर जावेसे वाटते आहे.
निसटलेले क्षण पुन्हा आठवून,
भर पावसात खूप रडावेसे वाटते आहे. - मंदार
शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२
सारेच सोपे नसते!
सारेच सोपे नसते!
तू गेलीस आणि बरोबर माझे मी पण सुद्धा घेऊन गेलीस. पण तरीही तू परत येशील याची सतत वाट पाहतो आहे.
तू गेल्यावरसुद्धा तू कधी परत येशील याची वाट बघणे,
सतत फोनवर लक्ष ठेवणे ,
तुझ्या एका कटाक्षा साठी सतत तुझ्या घरासमोर रेंगाळणे
सोपे नसते ना ग !
लोकांच्या गर्दीत , मित्रांच्या मस्करीत
कट्ट्यावरची चहा पीत , सतत कोणालातरी शोधणे.
आणि इतरांना त्याचा मागमूसही नसणे
सोपे नसते ना ग!
रात्री एकटक आकाशाकडे बघणे, चंद्रमाध्येही तुलाच शोधणे ,
न दिसताच त्याच्यावरच रागावणे, असेच करत रात्र संपवणे
सोपे नसते ना ग!
आठवणींना मनात कुठेतरी खोलवर लपवून ठेवणे,
डोळ्यातील अश्रूंना पापण्याआड आडवून धरणे,
तरीही सतत हसत खेळत राहणे,
नेहमीच सोपे नसते ना ग!

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)