बुधवार, १८ जुलै, २०१२

असे म्हणतात की , प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
तिच्या असण्यानेच सारे काही सोपे होते.
.
.
.
मला यश नेहमीच  हुलकावणी देत आले आहे.


असे म्हणतात की , प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तिच्या असण्यानेच सारे काही सोपे होते. . . . मला यश नेहमीच हुलकावणी देत आले आहे.
त्रिवेणी


शनिवार, १४ जुलै, २०१२

भर पावसात...

परत एकदा पावसात भिजावेसे वाटते आहे.
जुन्या गोष्टी परत करावेसे वाटते आहे. 


शाळेचा उनिफोर्म घालून, 
चिखलातून धावत जावेसे वाटते आहे.


कॉलेज च्या मित्रांबरोबर मस्ती करत, 
परत एकदा भिजत घरी यावेसे वाटते आहे. 


तिच्या बरोबर भर पावसात, 
परत फिरावेसे वाटते आहे. 


कमरे एवढ्या पाण्यात एकमेकांना सावरत, 
परत एकदा तिच्या बरोबर जावेसे वाटते आहे.

निसटलेले क्षण पुन्हा आठवून, 
भर पावसात खूप रडावेसे वाटते आहे. - मंदार