शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

शेवटची भेट


आज शेवटचे भेटायला ये म्हणतेस मला,
भेटायला सुध्हा तीच जागा भेटली तुला,
जिथे पहिल्यांदा भेटायला आली होतीस .....

आज ही मी नेहामीप्रमानेच लवकर,
आणि तू नेहामीप्रमानेच उशिरा...
नेहमीच तू उशीर करतेस म्हणुन त्रागा करणारा मी
आणि आज तू येयुच नयेस म्हणुन प्रार्थना करणारा मी।

शेवटी आलीस एकदाची , पण पुर्वीसारखी नव्हतीस
मीही कुठे राहिलो होतो पुर्वीसारखा शेवटची भेट जनवताना॥

क्षणभर थांबलीस , माहित आहे तुला काही बोलता येत नव्हते
आणि मला काही एकायाचे ही नव्हते

शेवटी बोललीस नेमके तेच जे एकयाचे नव्हते
जसे शब्द कानावर पडत होते,मन माझे तुटत होते

आज कधी नव्हेत ती तुज्याकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती
आणि नजर तुज्या पयांवारून हटत सुद्धा नव्हती...

ते नाजूक कोमल पाय, आणि लाली लावलेली बोटे
खूप सुंदर भासत होती...
या आधी कधी पाय बघायची वेळच आली नव्हती,
कारण कधीच तुझ्या चेहऱ्यावरून नजर हटली नव्हती.

तू बोलत होतीस, मी नुसता उभाच होतो
तुझ्या बरोबर असतानाही एकटा पडत चाललो होतो.

डोळ्यात अश्रू दाटले होते,आणि शब्द ओठांआड गडप झाले होते
तू मात्र अखंड बोलत होतीस,तुटलेलं मन माझे अजून तोडत होतीस..

अचानक सर्व काही शांत झाले, काळच थांबल्याचा भास मला झाला
जेव्हा माझ्या हातांना तुझ्या कोमल हातांचा स्पर्श झाला...
माझ्याकडे एकदा तरी बघ म्हणत अचानक तुझा आवाज आला,
पायाकडची नजर तुझ्या चेहऱ्याकडे वळली,
प्रथमच तुझ्या प्रेमाची किंमत मला कळली..

पटकन दोन मोतीबिंदू माझ्या ओंजळीत पडले,
इतके वर्ष जे कधीच नाही सांडले.

शेवटचे काहीच न बोलता निघालीही ती गरकन वळून,
शेवटची ती भेट माझ्या ओंजळीत ठेऊन
मी मात्र तसाच उभा होतो शेवटपर्यंत
त्या पाठमोर्या आकृतीकडे आशेने बघत
आपल्याच नशिबावर हसत
शेवटची ती भेट सावरत...

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

कधी कधी.......


कधी कधी
जुनी डायरी उघडताच, आतून डोकाऊन बघतेस
वर मन करताच, दूर निघून गेलेली असतेस.

कधी कधी,
चांदण्या रात्री, मागून येऊन डोळे घट्ट मिटते
आणि उघडायचा प्रयत्न करताच, सकाळ झालेली असते.

कधी कधी,
दूरच्या प्रवासात, अचानक बाजूला येऊन बसते
हात हातात घेताच, सीट रिकामीच भासते.

कधी कधी,
समुद्र लहारीन्प्रमाणे, किनारी बागडताना दिसतेस
जवळ जाताच लाटांप्रमाणे निघून गेलेली असतेस.

कधी कधी,
स्वप्नांमध्ये हि येते, घट्ट मिठी मारते
ती मिठी सोडवताना मात्र, उशीच फाटलेली असते.

कधी कधी
कधी कधीच कशाला तू तर नेहमीच बरोबर असते
....................., माझ्या मनात कायमचीच वसते.

नेहमी हे असेच का होते?


नेहमी हे असेच का होते?
काहीतरी होणार वाटताना ,
भलतेच घडून बसते
सर्वच अपेक्षांवर पाणी फिरते.

कुणीतरी अचानक खूप जवळचे वाटते,
अमाप आनंद देते, आणि
नेमके हवेहवेसे असतानाच एकटे करून जाते.
नेहमी हे असेच का होते?

आयुष्यातल्या चुकांची जाणीव, मरणाच्या दारातच का होते,
मरण येते आहे म्हणून प्रायश्चित्त हि घेणे राहून जाते.
नेहमी हे असेच का होते?

कितीही जाणून घायचा प्रयत्न केला, तरी काहीतरी राहूनच जाते.
बहुतेक हेच आयुष्य असते, आणि ते असेच जगायचे असते.
नेहमी हे असेच का होते?

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

तू नसतेस न बरोबर...


काय सांगू,
हल्ली झोपच येत नाही
आता तर स्वप्न हि पडत नाहीत पूर्वीसारखी
हल्ली रात्री पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत
कारण, तू नसतेस न बरोबर.............

हो,पण असतात त्या आठवणी
हृदयाच्या कोपऱ्यात हळुवारपणे जपलेल्या,
करतात त्या सोबत अलीकडे
दिवसा, रात्री,कायमच
पण तुझी सर मात्र त्यांना येत नाही
कारण, तू नसतेस न बरोबर........

शेवटी आठवणीच त्या,
चांगल्या वाईट भूतकाळाच्या
हो,पण मला मात्र चांगल्याच आठवणी येतात तुझ्या
तुझे ते गोड हसणे,मला सतावताना खोडकर हसणे,
रात्री सारेच असस्ते डोळ्यांसमोर
पण, तू नसतेस न बरोबर........

हल्ली घेतो त्या आठवणींनाच कुशीत
बोलतो मग त्यांच्याशीच तू समजून
देतात परत ते सारे सुंदर क्षण
पण त्या वेळेची सर त्यांना येत नाही,
कारण, तू नसतेस न बरोबर....
मंदार सावंत २०/९/१० १२:१५

प्रिये

हळूच प्रिये तू येऊन जा,
कानात काही गुणगुणून जा..

वाऱ्याच्या झुळूकीप्रमाणे,
सहवास तुझा तू देऊन जा..

सुंदर मादक गंध तुझा,
मागे सुगंध तू ठेऊन जा..

दर्वळूदेत सभोवतालचे सारे,
धुंद मला तू करून जा..

तुझ्या पैजणांची रुणझुण,
हलकेच चाहूल देऊन जा..

रात्री मन माझे कावरे बावरे,
स्वप्नात मला तू घेऊन जा..

स्वर्ग वाटे सभोवती सारे,
तुझे असणे तू देऊन जा..

अश्रू दाटले आठवणीत सारे,
तयांची वाट मोकळी तू करून जा..

पुन्हा एकदा तू भेटून जा..
भेटून जा........................

२३/८/१०

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

भांडण!

आज खूप एकटे एकटे वाटतंय, दूर काळोखात लपून रहावेसे वाटतंय
जसे पौर्णिमेच्या रात्री चंद्र आहे, पण तोही एकटा एकटा वाटतोय.
रात्र काही केल्या संपत नाहीय, आणि दिवस पण हळू हळू चालू आहे
मनामधले प्रश्न मेंदूतल्या उत्तरांशी द्वंद्व खेळत आहे.
शेवटी मेंदू च जिंकत आहे , आणि मनही त्यापुढे नतमस्तक होत आहे
उत्तर फक्त एकच मिळत आहे, विश्वास थोडा दल्मालतो आहे.

माहित आहे तिलाही त्रास होत असेल,तीही दिवस रात्र तळमळत असेल
पण माझी जखम खूप खोल आहे, ती तिला दिसत का नसेल?

कोणासाठी कधीतरी....


ती गेल्यानंतर पडलो होतो एकटा.
वाटले सारे आयुष्याच घेऊन गेली.
राहवत नव्हते एकटे, न बोलावत होते
रडून डोळे सुजलेले,
पण पाणी त्यातले आटलेले.
आलीस अचानक आयुष्यात,
आणि आयुष्याच बनून राहिलीस.
सुरुवातीचे भांडण नंतर झालेले प्रेम
सारेच काही न तुला कळले न मला कळले.

जिच्यासाठी लिहिलेले तिला खूप आवडलेले आज लिहितो आहे इथे तुमच्या समोर.
तिच्या परवानगीशिवाय Sorry!

थोडेसे माझ्याबद्दल

आज बरेच ब्लोग वाचून मलापण परत लिहावेसे वाटायला लागले आहे, त्याचीच हि सुरुवात बघू कंटाळा न करता किती दिवस लिहू शकतो.तर तसा मी बऱ्याच आधीपासून लिहितो आहे. पण काय करणार कंटाळा दुसरे काय म्हणूनच सर्व अर्धवट राहून जाते.तर मला स्वतः काहीही करायला कंटाळा येतो. मला स्वतःलाच समजत नाही कि मी काय काय करू शकतो ते, इतरांनी सांगितले तरच मला समजते तर असा आहे मी.
लिहायची सुरुवात पण तशीच झाली. मध्ये काही कारणामुळे डायरी लिहायला सुरुवात केली. आधी कशी लिहायची तेच नाही समजत होते, मग दिवसा प्रमाणे काहीतरी खरडायला सुरुवात केली.मग परत कंटाळा म्हणून परत बंद.मग एका मैत्रिणीने सांगितले कि तू कसा आहेस ते काही समजत नाही. आणि तुला ओळखणे खूप कठीण आहे. मग काय झाली लगेच कॉलर टायीत. आणि हो ती सुद्धा खूप छान लिहिते. तिची कवितेची डायरी पण मी वाचली आहे.तेव्हा ती म्हणाली कि तू सुद्धा असेच लिहित जा मनातले जे वाटेल ते. मग त्रास नाही होत. म्हणून मग केली सुरुवात काहीतरी वायफळ लिहायला. दिसेलच तुम्हाला पुढे ते. ...
त्यानंतर बरेच दिवस काही न काही लिहिले जे वाटले जे भावले जे अनुभवले ते. मग परत बंद आता परत एका मैत्रिणीने सांगितलं तू लिही मला वाचायचे आहे तू छान लिहितोस.( बर हि मैत्रीण दुसरी बर आधीची नाही )
आणि साम्य म्हणजे हीसुद्धा खूप छान लिहिते मी एक तिच्या लिखाणाचा चाहता आहे असे समजा. तर तिच्या सांगण्यावरून मी आता परत लिहायला सुरुवात करतो आहे. एकंदरीत काय तर मला काहीतरी करायला दुसर्याकडून सांगितले गेले पाहिजे तरच मी ते करतो.
तर थोडासा असाच काहीसा आहे मी!