आज प्रथमच एक छोटीशी कथा लिहिणार आहे. माझ्या कल्पनेतली नाही, हि मी redio वर ऐकलेली आहे.
एक कार्यक्रम यायचा रात्री ९ वाजता FM चे नाव आठवत नाही पण त्या कार्यक्रमाचे नाव कधीही नाही विसरता येणार. "याद शहर" खूप सुंदर असायचा आणि तो RJ तर मस्तच.
अगदीच गुंगून ठेवायचा कथा सांगताना. आणि आता मी सांगणार आहे ती कथा खूप महत्वाची आहे माझ्यासाठी आणि योग्य वेळी मला ती ऐकायला मिळाली होती.
हि कथा आहे दोन मित्रांची रमेश आणि सुरेश यांची.
रमेश आणि सुरेश दोघेही लहानपणापासूनचे मित्र शाळेत असताना सुद्धा नेहमीच एकत्र असायचे, खेळताना एकत्र मधल्या सुट्टीतला डबा सुद्धा एकत्रच. खूप जपायचे एकमेकांना,
कोणालाही बडवायचे असेल तरीही एकत्रच अगदी जीवाभावाचे मित्र होते. दोघानाही क्रिकेट चे खूप वेड. एक होता तेज गोलंदाज तर दुसरा होता उत्कृष्ट फलंदाज. जस जसे दिवस जात होते तशी मैत्री अजूनच घट्ट होत होती.
दोघांच्या हि घरी त्याच्या मैत्रीबद्दल माहित होते. सर्वच छान सुरु होते. आता दोगेही कॉलेज ला पण जायला लागले होते. नवीन सर्व तरुण रक्त, जसे तारुण्यात मनात भाव असतात तसेच त्या दोघांच्याही मनात होते.
मुलींबद्दल आकर्षण .... पण कधी त्रास द्यावासा नाही वाटला दोघानाही, कुठच्याही मुली ला . त्यांच्या ह्या एकंदरीत वागण्यामुळे बर्यच मुली फिदा झाल्या होत्या. त्यातच दोगेही कॉलेज च्या क्रिकेट टीम मध्ये, आणि हे दोघे म्हणजे
सामना विजयी होणार हे सुद्धा नक्कीच. म्हणजे सांगायचेच झाले तर सर्व काही छान सुरु होते.
त्यातच रमेश ला प्रिया आवडू लागली होती. प्रिया म्हणजे कॉलेज ची जान होती, सुंदर ,सालस... सर्व पोर तिच्यावर जीव द्यायला तयार पण तिला मात्र कोणीच नाही आवडायचे. रमेश तिच्यावर खूप प्रेम करायचा पण तिला ते सांगायची त्याची कधी हिम्मतच झाली नाही.
प्रथम हि गोष्ट त्याने सुरेशलाच सांगितली. सुरेश सुद्धा खुश होता आणि प्रियाला पटवण्यासाठी रमेश ची मदत करत होता. दिवस जस जसे जात होते तसा रमेश पूर्णपणे प्रियामध्ये बुडून जायला लागला. पण प्रियाला त्याची जराही खबर नव्हती.
हळू हळू वर्ष संपत आलीत कॉलेज विश्वातून बाहेर पडायची वेळ जवळ यायला लागली होती. रमेश चे प्रेम तर खूप पुढे गेले होते, परंतु अजूनही त्याने प्रिया ला यातले काहीच सांगितले नव्हते. सुरेश ने बर्याचदा सांगूनही त्याचा धीराच झाला नाही प्रिया शी बोलण्याच्या,
आपले अव्यक्त प्रेम तिच्यापुढे ठेवण्याचा.
शेवटच्या परीक्षेच्या २ महिने अगोदर इंटर कॉलेज क्रिकेट सामने होते. आणि ह्याच्या कॉलेज मधून रमेश आणि सुरेश दोगेही टीम मध्ये होतेच. दोघांनीही सुरेख खेळ करत त्याच्या टीम ला अंतिम सामन्यापर्यंत आणले होते.
परंतु ह्या दरम्यान सुरेश नेहमीच थोडा अस्वस्थ असायचा, पण सामन्याच्या तयारीमध्ये रमेश ला हे कळले सुद्धा नाही.....
अखेर आज अंतिम सामना आला. सकाळपासूनच रमेश सामन्याच्या तयारीत होता. वेळ झाली तो मैन्दानावर आला. पण आज त्याचेही लक्ष लागत नव्हते, त्याची नजर सतत कोणालातरी शोधत होती. त्यालाच त्याच्या जिवाभावाच्या मित्राला सुरेश ला...
तो आज मैदानावर नव्हताच. चौकशी केल्यावर समजले कि अचानक काही कामामुळे त्याला गावी जायला लागले होते. पण ...
हा पण सारखा त्याच्या डोक्यात येत होता. कि असे की झाले आणि त्याला मलाही न सांगता गावी जावे लागले. संपूर्ण सामना तो ह्याच एक गोष्टीचा विचार करत होता. परंतु हाडाचा फलंदाज असल्यामुळे ह्या गोष्टीचा त्याच्या खेळावर मात्र काहीच परिणाम झाला नाही.
अजून एक उत्कृष खेळी करून त्याने स्वतःच्या कॉलेज ला विजयी करून दिले होते. आणि सामनावीर म्हणून पुरस्कार पण मिळवला होता. परंतु अजूनही तो सुरेश चाच विचार करत होता. त्याला काही प्रोब्लेम तर नाही न झाला. माझी गरज तर नसेल ना?...
दोन दिवस झाले सुरेश ची काहीच खबर नव्हती. फोन सुद्धा बंद होता. रमेश ला काही एक सुचत नव्हते. त्यात दोन दिवस त्याला प्रिया सुद्धा कॉलेज ला दिसली नव्हती. त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ झाला होता.
रमेश चे लक्ष कशातच लागत नव्हते.... आणि अचानक त्याला कॉलेज मध्ये एक बातमी मिळाली. त्याने तर रेमेश्च्या पायाखालची जमीनच सरकली. सारे जग आजूबाजूला फिरू लागले. हळूहळू त्याचे डोकेही बधीर व्हायला लागले. कसाबसा तो घरी पोहोचला आणि आपल्या खोलीत
जाऊन मटकन खालीच कोसळला. त्याला मिळालेली बातमी अशी होती कि "सुरेश आणि प्रिया यांनी लग्न केले आहे आणि तेही पळून जाऊन ". काही दिवस असेच निघून गेले रमेश कोणाशीच काही बोलत नव्हता. त्याच्या घराचेही काळजीत होते. सतत सुरेश बद्दल विचार चालू होता त्याच्या डोक्यात.
अतिशय राग आला होता त्याला, त्याच्याच जिवाभावाच्या मित्राने त्याला धोका दिला होता. घट्ट मैत्रीच्या जागा आता सूड आणि त्वेष याने घेतली होती. रमेशने तर क्रिकेट खेळणे सुद्धा बंद केले होते. तो अचानक शांत झाला होता. पण कोणालाही त्याचे कारण समाजात नव्हते. त्याच्या वागण्यामध्ये पण कमालीचा बदल झाला होता. असाच एक महिना निघून गेला. रमेश त्यामधून थोडा सावरायला लागला होता पण सुरेश वरचा त्याचा राग जराही कमी झाला नव्हता. एकच गोष्ट रमेशच्या मानाने घेतली होती ती म्हणजे सुरेश ने केलेला विश्वास घात.
आता जेमतेम एक महिना शिलक राहिला होता परीक्षेचा, रमेशने हळू हळू का होईना अभाय्साला सुरुवात केली होती. आणि इथे सुरेश आणि प्रिया या दोघांनीही कॉलेज ला येणे सुरु केले होते. पण रमेश आणि सुरेश एकमेकांसमोर यायला धजत नव्हते. तसे म्हणण्यापेक्षा सुरेश ला खूप काही बोलायचे होते रामेह बरोबर पण तो परीक्षा संपण्याची वाट बघत होता.
आज शेवटचा पेपर होता आणि सुरेश खूप आधी पासून ठरून आला होता आज काहीही झाले तरी रमेश बरोबर बोलायचेच. त्याला सगळे सांगायचे. म्हणून आज जरा नेहमीपेक्षा लवकरच पेपर संपून तो कॉलेज च्या बाहेर रमेश येण्याची वाट बघत होता. तेवढ्यात त्याला प्रिया येताना दिसली. ती सुद्धा त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. म्हणाली "पेपर कसा होता ?" पण आज सुरेशचे लक्ष रमेश सोडून कशातच नव्हते. त्याने तिला फक्त छान म्हणून उत्तर दिले आणि घरी जायला सांगितले नाहीतर उगाचच हिला बघून रमेश अजून रागवायचा माझ्यावर म्हणून तो परत रमेश ची वाट बघत बसला.
बराच वेळ होऊन गेला परंतु रमेश काही त्याला दिसला नाही. एव्हाना सारे कॉलेज शांत झाले होते. सुरेश तसाच हताश होऊन तिथून निघतो तो थेट रमेश चं घरीच. पण तेथेही त्याच्या हाती काहीच लागत नाही. कारण रमेश कधीच दूर त्याच्या मामाच्या गावी निघून गेलेला असतो.
आता एका वेगळ्याच द्वंद्वामध्ये सुरेश अडकून जातो. त्याला रमेश ला समजावयाचे असते आणि तो जवळही नसतो, की करावे काहीच सुचत नाही त्यालाही खूप अपराधी वाटायला लागते. तो लगेच रमेश ला फोन करतो परंतु फोन सुद्धा बंद मिळतो. आता मात्र सुरेश पुरता हडबडून जातो. कारण त्याने एक जिवाभावाचा मित्रा गमावलेला असतो. खूप प्रयत्न करूनही त्याला रमेश पर्यंत पोहोचता नाही येत.
दिवस जाऊ लागतात दोगेही एका चांगला कंपनी मध्ये कामाला सुरुवात करतात, पण अर्थातच वेगवेगळ्या शहरात. आता तर सुरेश आणि प्रीयासुह्द्या दुसर्या शहरात राहायला आलेले असतात. रमेश अजूनही काहीच विसरू शकलेला नसतो. सुरेश वर त्याचा खूप राग भरलेला असतो. आता ह्या गोष्टीला ३ वर्षे उलटून गेलेली असतात. रमेश ला आता त्या कंपनी चा कंटाळा आलेला असतो तेच तेच काम तेच रुटीन म्हणून तो पुरता कंटाळून गेलेला असतो. म्हणून तो नवीन नोकरी साठी अर्ज करत असतो. मध्येच एकदा तो गावी आपल्या घरी सुद्धा जाऊन येतो. परंतु आता सुरेश्बद्दल सुद्धा कोणालाही काहीच माहित नसते. आणि जेव्हा तो परत शहरातल्या आपल्या घरी येतो तेव्हा एका पर्तिष्टीत कंपनी मधून त्याला बोलावणे आलेले असते.
रमेश ची जाण्याची तयारी सुरु होते. ईन्तेर्विएव च्या १ दिवस आधीच रमेश त्या शहरात्त जाऊन पोहोचतो. प्राथमिक फेरी पूर्ण होते. अर्थातच रमेश हुशार असल्यामुळे त्याला तसा काही त्रास नव्हताच. दुसरी फेरीही छान पैकी पार पडते. आता मात्र सर्वात कठीण फेरी असते.तो केबिन मध्ये प्रवेश करतो
तर समोर सुरेश बसलेला असतो. त्याला बघून प्रथम रमेश ला धक्काच बसतो . तो परत फिरणार इतक्यात अजून दोघे जन आता येतात. आता मात्र रमेश ला सुरेश समोर बसावेच लागते. सर्व काही सुरळीत पार पडते. आणि रमेश परत जायला निघतो तर त्याच्याचसाठी रिसेप्शन वर एक मेसेज ठेवलेला असतो. तो वाचून त्याला अजूनच राग येतो. मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या साऱ्या भावना परत उफाळून येतात. पण सुरेशची शेवटची request म्हणून तो थांबायचं निर्णय घेतो.
थोड्या वेळातच सुरेश तिथे येतो आणि रमेश ला आपल्याबरोबर यायला सांगतो. रमेश चा संताप होत असतो परंतु तो शांत असतो, निदान दाखवण्याचा तरी प्रयत्न करत असतो. सुरेश रमेश ला आपल्या घरी घेऊन जातो.
सुरेश च्या घरात पाऊल पडताच मात्र रमेश चा स्वतः वरचा ताबा सुटतो. सरळ सरळ सुरेश चा गळा पकडून तो त्याला जाब विचारू लागतो. आत्ता मात्र सुरेश ला रमेश ची भीती वाटू लागते. पण त्यातही तो रमेश कडे एकदा बोलायची संधी मागतो.
तेवढ्यात रमेश ला लक्षात येते कि घरात प्रिया कुठेच दिसत नाही आहे. तेव्हा सुरेश बोलायच्या आधीच रमेश त्याला प्रिया बद्दल विचारतो.आणि बोलायला सुरुवात करतो. प्रिया जशी तुझी नव्हती कधी तशीच माझीही झाली नाही कधीच. त्यादिवशी अंतिम सामना असूनही मी आलो नव्हतो, आठवत असेल तुला. त्याला कारणच तसे होते. गावी माझे वडील खूप आजारी पडले होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. म्हणूनच मला तिथे लगेच जाणे गरजेचे होते. आणि तुही येशील माझ्याबरोबर माहित होते मला म्हणून तुलाही काहीच न सांगता निघून गेलो. कारण
कॉलेज ला तुझी गरज होती. रमेश च्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलत होते. आणि सुरेश पुढे बोलू लागला. गावी गेलो आणि बाबांना तसे बघून राहवलेच नाही. त्यांना या आधी कधीच असे झोपून राहिलेले बघितले नव्हते. आणि जेव्हा बाबांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी त्यांची शेवटची इच्छाह बोलून दाखवली. म्हणाले मी आहे तोपर्यंत तुझे लग्न झालेले पाहायचे आहे नाही म्हणून नकोस. मी मुलगी सुद्धा बघून ठेवली आहे खूप सुंदर आहे. तुझ्याच कॉलेज ला आहे आणि माझ्या मित्राची मुलगी आहे. आम्ही आधीच ठरवले होते पण तुमचे कॉलेज पूर्ण होण्याआधी काहीच सांगायचे नाही असे ठरवले होते . पण बाला माझ्याकडे आता खूप कमी वेळ आहे तर कृपया नाही म्हणून नकोस. आणि मी लगेच त्यांना वाचन देऊन मोकळा झालो. कारण प्रथमच त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागितले होते.
घरी आल्यावर मला त्या मुलीबद्दल समजले आणि काही काल मी सुन्नच होऊन गेलो. कारण दुसरी तिसरी कोणीही नसून ती प्रिया होती. काय करावे काहीच समजत नव्हते. बाबांना नाही म्हणून दिलेले वाचन मोडणार होतो. आणि हा बोलून तेव्हाच तुलाही दुरावलो होतो. की करावे काचीच समजत नव्हते. कोणाशीही बोलता पण येत नव्हते. तुझ्याशी बोलायला हि खूप भीती वाटत होती, वाटले तू समाजशील का मला? बाबा घरी आले आणि घाईत आमचे लग्न झाले. पुढे आम्ही दोगेही परत कॉलेज ला आलो. म्हटले तुझ्याशी एकदा बोलून तुला सर्व काही सांगायचे. पण तू भेटायला तयारच नव्हतास.
खूप वाईट वाटत होते माझ्यामुळे नकळत का होईना पण तुला त्रास झाला होता खूप मोठा. आणि त्याचे प्रयाचीत सुद्धा करायची संधी नाही दिलीस तू मला. खरच मला माफ कर......
आता मात्र रमेश पुरता नरमला होता त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागलेत. खूप काही गमावल्याचे दुख त्याला होत होते. आणि सुरेश ला सुद्धा माफी मागायची संधी मिअली होती. दोगेही आज खूप रडले. तेही कडकडून मिठी मारून. आज दोन जिवलग मित्रा परत एकमेकांना भेटले होते. बराच वेळ दोगेही एकमेकांची माफी मागत होते. हळूहळू दोगेही सावरले.खूप छान वाटत होते दोगांनाही. तेवढ्यात रमेशने पुन्हा प्रिया विषयी विचारले.आणि सुरेश बोलायला लागला कि एका वर्षातच आमचा घटस्पोट झाला. ती माझीही कधीच नाही होऊ शकली. तिचे दुसर्याच कोणावर प्रेम होते.
आणि ती निघूनही गेली. आता मात्र रमेश अजूनच वाईट वाटले कि आपण आपल्या मित्राला खूप चुकीचे समजले होते म्हणून. त्या दिवशी रमेश सुरेश च्या रूम वरच राहिला. आणि दुसर्या दिवशी आपल्या शहरात निघून गेला खूप काही मिळून परतल्याचा आनंद घेऊन.
काही दिवसातच त्याने सुरेश बरोबर कामाला सुरुवात केली नवीन कंपनी मध्ये. सर्व काही छान सुरु झाले पूर्वीप्रमाणेच दोनीही जिवलग परत भेटलेले. बर्याच दिवसांनी कंपनी ने एक क्रिकेट चा सामना आयोजित केला कि त्यामुळे सर्वांना कामातून थोडा विरंगुळा मिळेल म्हणून.
आज सर्व जन मैदानावर उभे होते अर्थातच रमेश आणि सुरेश पण होतेच त्यात.सर्व जन सामन्याची तयारी करण्यात गुंतले होते. आणि तेवढ्यात रमेशने सुरेश ला एक जोरात हाक मारून जवळ बोलून घेतले, आणि दूर एके ठिकाणी बोट दाखून म्हणाला ती दिसते आहे न लाल ड्रेस घातलेली ती माझी आहे .आणि जर परत तू मध्ये आलास तर सोडणार नाही! असे म्हणून दोगेही मनापासून हसतात........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा