तशी मला ट्रेकिंग ला जायची खूप इच्छा होती पण कधी जमलेच नाही.अचानक एक दिवस मला फोन आला कि आपण पिकनिक ला जायचे आहे तर तू येणार का? मी तर नेहमीच एका पायावर तयार असतो पिकनिक ला जायला. आणि मग आम्ही एकत्र भेटलो ठिकाण नक्की करण्यासाठी. अरे हा पण आम्ही कोण ते सांगितलेच नाही.तर मी स्वतः, जितेंद्र(जितु), ग्रेश एकत्र जमलो आणि ठिकाण नक्की केले आणि तेसुद्धा ट्रेकिंग ला जायचे. अशा ठिकाणी कि ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही, ते म्हणजे
महाराजांचा गड - किल्ले राजमाची. लोणावळा आणि कर्जत यांच्या मधोमध असलेल्या कोंदिवडे गावाजवळ. बस नक्की झाली सर्व तयारी झाली.आणि तो दिवस उजाडला १८ जुलै २०१०.
आम्ही सर्व ५.३० ला दादर पूर्वेला स्वामीनारायण मंदिराजवळ भेटणार होतो. आम्ही सर्व मिळून २० जन होतो.
तर सुरुवात करूयात एका अविस्मरणीय अशा आमच्या ट्रेक ला.
नेहमीप्रमाणेच आम्हाला म्हणजे मी , जितु (management गुरु ), ग्रेश, दादा,आणि इतर. सर्वांना निघायलाच ५.३० वाजले. दादर ला भेटणारी मंडळी वेळेवरच येऊन पोहोचली होती. इथूनच आमच्या दिवसाची खराब सुरुवात झाली. आधीच निघायला उशीर त्यात ट्रेन पण उशिरा. मग काय बसलो वाट बघत ट्रेन ची बरोबर सकाळी ६.०० वाजता ची बोरीवली ट्रेन होती. इतक्यात कोण जाने आमचा पिकनिक गुरु उर्फ जितु म्हणाला 'be prepared for surprises' . आणि त्याचे बोलणे संपायच्या आतच आम्हाला फोन आला कि दादर स्टेशन च्या बाहेर आमची बस RTO ने पकडली आहे नो पार्किंग झोन मध्ये. शेवटी कसेबसे त्या संकटातून बाहेर पडलो...त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे आमच्या बस चे परमिट संपले होते आणि चालकाकडे कडे परवाना पण नव्हता. म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही पुरते फसलो होतो. पिकनिक गुरूंच्या management चे तीन तेरा वाजले होते. पण आता तीच बस वापरण्याशिवाय पर्याय नव्हता, निघालो! प्रवासाला एकदाची सुरुवात झाली.पण भीती होतीच परत पकडलो गेलो तर सुटका नाही.
बरोबर ७.२५ ला आम्ही ठाण्याला पोहोचलो , तिथे आम्हाला अजून एक दुसरा ग्रुप येऊन मिळणार होता. त्या ग्रुप ने जरा वेळच काढला बस पर्यंत पोहोचायला.
त्यामुळे आम्हाला निघायला ८ वाजून गेलेत. मग निघालो ठाण्याहून driver तर फक्त बस चालवत होता त्याला कुठचाही रस्ता माहित नव्हता. त्यामुळे त्याने कल्याण भिवंडी मार्गे हळू हळू बस कर्जत न्यायला सुरुवात केली. मध्येच चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि निघाली आमची बस मजल दरमजल करीत.
--------------------------------------------------------------------------------------
तसे ठाण्याच्या ग्रुप बरोबर आम्हाला काही जमून घायला होत नव्हते.तरीही सर्व मस्ती मज्जा करने सुरु होते. आणि अचानक आमच्या driver ने एका मोटार बाईक वाल्याला हळूच बाजूने टक्कर दिली. झाले त्याला तसे लागले नाही कारण तो वेळीच सावध झाला म्हणून नाहीतर kay झाले असते विचारही नाही करू शकत. झाले की मग गावातले लोक एकत्र,आमची बस थांबविली, आणि सुरुवात केली driver ला मारायला....मग कसेबसे आम्ही त्या संकात्तातून वाचलो आणि driver ला पण वाचवले. आणि आमची बस पुढे निघाली. कर्जत जवळच आले होते. बाहेर चान वातावरण होते. sundar अशी हिरवळ पसस्रली होती. डोंगर रांगा तर अगदी ढगांनी वेधल्या होत्या ते दृश्य म्हणजे मनाला शांतता करणारे असे विलोभनीय असे दृश्य होते. हे पहा ते दृश्य......
------------------------------------------------
मजल दरमजल करीत पोहोचलो एकदाचे कर्जत ला. जवळ जवळ १० वाजून ४० मिनिटे होऊन गेली होती. तिथून पुढे एक फाटा कोंदिवडे गावाजवळ जात होता त्यामुळे आमची बस तेथे वळवण्यात आली. त्या फाट्या नजीक वाहनांची रहदारी सांभाळण्यासाठी एक पोलीस उभा होता. त्याने नेमके आमच्या बस ला हटकले आणि थांबण्याचा इशारा केला. पण बस थांबविली असती तर तो आमचा driver कसला, नेली बस तशीच पुढे, झाले परत एक नवीन संकट उभे ठाकले. त्या पोलिसाने मोटार बाईक वरून येऊन आमची बस थांबवायला लावली. परत तेच सर्व जे दादर स्टेशन ला झाले होते सकाळी सकाळी.. तिहे थांबलो तेव्हाचे दृश्य.
तसे लवकरच सटकलो तिथून बहुतेक आमच्या driver ला याची आता सवय झाली असणार. पुढे शोधात शोधात कोंदिवडे गावाजवळ आमच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो. सर्वच तसे कंटाळले होते कारण सकाळ पासून जराही पाऊस नव्हता, आणि उशीर सुद्धा खूप झाला होता. मग आम्ही एक वाटाड्या बरोबर घेतला तशी आधी सर्व सोय आमच्या management गुरु यांनी केलीच होती. आणि सुरुवात झाली आमच्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या ट्रेक ला. ती म्हणजे बरोबर दुपारी १२.०० वाजता , सर्व तसे कंटाळले होतेच कारण खूप उशीर झाला होता सर्व management चा बट्ट्याबोळ झाला होता. सुरुवातीचा काही वेळ फोटो काढणे(वेळ काढणे) यात गेला. जसे सर्वजन स्वतःला फोटोग्राफर समाजात होते तर काही स्वतःला हिरो म्हणून घेत होते.
कसेबसे हळूहळू राजमाचीचा डोंगर चढत जवळ जवळ अर्ध्या तासात आम्ही कोंढाणा लेण्यांकडे पोहोचलो. जाताना काढलेली काही छायाचित्रे टाकत आहे.
खूप सुंदर आणि नयनरम्य दृश्य पाहून मन सुखावत होते. ते वाहणारे झरे आणि लहान मोठे धबधबे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
ते लेण्यांकडचे विलोभनीय दृश्य पाहून एखाद्याचे पाय तेथे थांबले नाहीत तर नवलच. कड्यावरून कोसळणारे ते पाणी, आणि ते सुंदर असे नक्षीकाम, त्यावेळच्या कारागिरीची साक्ष देते. मग तेथेच सर्वांचे पाय रेंगाळले. तसा पाऊस आमच्यावर रागावलाच होता सकाळपासून त्यामुळे सर्वांनी त्या मंद अश्या धबधब्याखाली पावसाचा आनंद लुटायला सुरुवात केली. माझे तसे spl ट्रेकिंग चे बूट होते एकदम नवीन कोरे करकरीत.त्यामुळे ते भिजून खराब करायची अजिबात इच्छा नव्हती. तसे ते बाजूला ठेऊन जाऊ शकलो असतो. पण का कोण जाने भिजावेसे वाटलेच नाही. मग माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला. मी मुद्दामहुन एक डिजिटल SLR घेतला होता. तशी वापरायची प्रक्टिस फक्त १० मिनिटांचीच होती. पण तेथे काही सुंदर छायाचित्रे काढण्याची संधी मला मिळाली.
मग थोडा वेळ त्या नैसर्गिक तुषारांमध्ये भिजून झाल्यावर आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. परंतु आमच्या बरोबर असणारे काही वयोवृद्ध मनसे आणि एक गलेलठ्ठ मुलगी ज्यांना वर येणे शक्य नव्हते ते तेथेच त्या लेण्यां पाशी थांबले. आता आमचा २० जणांचा ताफा १८ वर आला होता. त्यातही एक आजी आमच्या बरोबर गड चढायला तयार झाल्यात. मग आमच्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही जंगलाच्या रस्त्याने जायचे ठरवले. त्याच्या म्हणण्या प्रमाणे आम्हाला वर पोहोचायला ३ तास लागले असस्ते. तसे लेण्यांकडून निघायलाच आम्हाला १.३५ झाले होते. हळू हळू त्या कडे कपार्यान्मधून आणि काळ्या दगडांवरून रस्ता काढत आम्ही हळू हळू वर चढत होतो. मध्येच वाहणारे झरे आणि पावसामुळे निसरडे झालेले दगड आणि माती यातून हळू हळू रस्ता काढत आम्ही चालत होतो. त्यात तिथल्या जंगलातल्या माश्यांनी तर सर्वांची हलत खराब करून टाकली होती. सुदैवाने मला एकही माशी चावली नाही. तसा मला डोंगर चढायची आवड असल्यामुळे मी सुरुवातीला सर्वांच्या पुढे होतो. जसा जसा वेळ जात होता तशी तशी माझी शक्ती कमी कमी होत होती. आणि मी मागे मागे पडत चाललो होतो. त्यातच माझ्या पायामध्ये गोळा आला, आणि चालानेसुधा मुश्कील झाले. कसे बसे आम्ही मधल्या एक पाठरापर्यंत जाऊन पोहोचलो. तेथेच आम्हाला ३.१५ झाले होते. मग तेथे १० मिनिटे आराम करून थोडेसे फोटो सेशन करून आम्ही पुढे निघालो. त्यात तो ठाण्याचा ग्रुप आमच्यावर नाराज होता कारण त्यांना त्यांच्या दोन ट्रेकिंग साठी अपरिपक्व माणसांना खालीच सोडून यावे लागले होते.
मग पुढे आम्ही परत वर चढायला सुरुवात केली. आता अजून जास्त चालायची टाकत माझ्यात राहिली नव्हती. कारण पाय खूप दुखत होता (गोळा aalyamule). कसे बसे करत एकदाचे आम्ही वर पोहोचलो, वर म्हणजे गडाच्या पायथ्याला तेसुद्धा बरोबर ४.१५ वाजता. आता अजून गडावर जाऊन परत यायचे आणि तसेच खाली उतरायचे कोणालाही जमले नसते. म्हणून सर्वानुमते तेथेच आराम आणि जेवण उरकून परत फिरायचे ठरले. मग तेथेच एका घरात आम्ही आमचा तळ ठोकला. तेथे जेवण उरकून चहा पिऊन आराम करून होईपर्यंत ५.३० होऊन गेले होते. आता परत कसे जायचे याचा विचार सुरु झाला. आलो त्याच रस्त्याने जायचे तर तो जंगलाचा खच खालाग्यांचा रस्ता होता आणि निसरडा पण होता. तसे आम्ही मुले कसेतरी जाऊ शकलो अससतो पण आमच्या बरोबरच्या आजी त्यांना जमले नसते. आणि पावसाचे दिवस असल्याने,तसेच आम्ही २००० फुतान्च्यापेक्षाही उंच असल्यामुळे ढग आणि पावसाचा अंधार यामुळे ६ च्या दरम्यानच काळोख पडायला सुरुवात झाली होती. म्हणून मग आम्ही दूर लोणावळ्याला जायचा रस्ता पकडला.
आमची बस कोंदिवडे गावातच थांबली होती. त्यामुळे आम्ही driver ला गाडी लोणावळ्याला आणायला सांगितली. तर त्याला लोणावळ्याला यायचा रस्ता माहित नव्हता. आता झाली पंचाईत. खाली थांबलेली दोन मनसे बस मध्ये बसून होती. आधीच driver आणि बस च्या मालाकामुळे आमची ट्रेक खराब झाली होती. त्यामुळे सर्वांनी कंटाळून driver ला बस घेऊन जाण्यास सांगितले. आणि आम्ही त्या लोणावळ्याच्या रस्त्याने निघालो....
हा रस्ता तसा बर्यापैकी रुंद आणि चांगला होता. कि एखादी गाडी आरामात येऊ शकली असती. अगदी त्या गावापर्यंत. परंतु रिमझिम पडणारा पाऊस आणि ढग ,त्यात ते थंड आणि दमात हवामान यामुळे तो मातीचा रस्ता खूपच निसरडा झाला होता. त्यात कडेने पाणी वाहत होते. मध्येच एखादे डबके येत होते. त्यातून वाट काढत हळू हळू रमत गमत मज्जा करा आम्ही १३ जन चाललो होतो.
आता मनात येयील कि १३ जन कसे मी तर आधी १८ म्हणालो होतो. हा तर ते बाकीचे ५ जन ठाणा ग्रुप चे होते. आणि आम्ही वरून निघाल्यापासूनच त्यांच्या मनात काहीतरी सुरु होते... आणि एक गोष्ट ती म्हणजे ट्रेक ला जाताना घ्यायची काळजी कोणीही घेतली नव्हती. त्यात दादा म्हणजे जितु चा मोठा भाऊ त्याचे शूज फाटले. तेव्हापासून तो अनवाणीच चालत होता आमच्या बरोबर. पुढे काही अंतर चालल्यावर आम्हाला एक डोळे दिपून टाकणारे दृश्य दिसले आणि सर्वच त्याच्याकडे ओढले गेलोत.
तेथे काढलेले काही छान असे फोटो.
ते बघून तिथून परत निघूच नये असे वाटत होते. पण आमच्या कडे वेळ खूप कमी होता कारण आता ६.३० वाजून गेले होते, त्यामुळे तिथून निघणे आम्हाला भाग होते. काही अंतर चालतच समोरून एक मुलगा आमच्याच ग्रुप चा प्रतिक आमच्या कडे आला आणि लांबूनच ओरडत होता कि जपून चला खूप निसरडे आहे पुढे. तेवढ्यातच पावसाला सुरुवात झाली होती. त्याचे म्हणणे सर्वांपर्यंत पोहोचायच्या आधीच सचिन पाय घसरून त्या रस्त्यावर पूर्ण झोपला. सर्व कपडे चिखलाने बरबटले होते त्याचे.आणि मी बाजूलाच असल्यामुळे पटकन त्याने मला पकडले त्यामुळे माझा रेनचीतर पण खराब झाले. नशिबाने माझ्या नवीन ट्रेक च्या शूज मुले मी उभा राहू शकलो नाहीतर मीसुद्धा त्याच्याबरोबर चिखलात पडलो असतो.
मग सर्वजण कडेने हळू हळू चालत होतो, त्या कडेला सुद्धा एवढी भुसभुशीत माती झाली होती कि पाय ठेवला तर अर्ध्या फुट पेक्षा जास्त आता रुतत होता. त्यात आम्हाला अजून एक वाईट बातमी समजली कि ठाणा ग्रुप ने त्यांच्यासाठी गाडी बोलून घेतली होती. आणि ते निघायच्या आत आम्ही तेथे पोहोचलो. परंतु आम्हालाच वरून दोष देऊन ते गाडीतून निघून गेलेत. आता शिल्लक राहिलो होतो आम्ही एकूण १४ जन बरोबर होतो . ह्या सर्व गोष्टींमुळे आमचा सर्वांचा मूड थोडा खराब झाला होता. आणि चालण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आता जवळ जवळ ७.१५ होऊन गेले होते. आणि काळोख पडू लागला होता. त्यात आम्ही बर्यापैकी उंचावर होतो त्यामुळे आजूबाजूने नुसते ढग जात होते धुके पडले होते त्यामुळे १० फुटांवरचे सुद्धा दिसणे थोडे मुश्कीलच झाले होते. नशिबाने आमच्या १४ जणांमध्ये एकाला लोणावळ्याचा रस्ता माहित होता आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे अजून कमीत कमी ३ तास तरी चालावे लागणार होते. त्यात पाऊस सुद्धा सुरु झाला होता. आम्ही सर्व हळू हळू चालत होतो. मध्येच एखादा लहान खेकडा पायाकडून जात होता. माझे बूट एक छोटासा पाण्याचा झरा ओलांडताना पूर्ण पाण्यात गेले होते त्यामुळे ते ओले पाय बुटात घालून वरून मोजे सुद्धा पायाची वाट लागली होती. आम्ही चालत होतो हळू हळू. पुढे काय होते काहीच माहित नाही. फक्त त्या वाटाड्या प्रतिक च्या सांगण्याप्रमाणे आम्ही चालत होतो. थोडी मज्जा करत होतो थोडे घाबरवणे सुरु होते. आम्हा १४ जणांमध्ये ७ मुले, १ लहान मुलगा आणि ६ मुली होत्या.
हळू हळू अंधार खूपच दाट व्हायला लागला, आणि ते जंगल! आमच्या शिवाय कोणीही दिसत नव्हते. आता जवळ जवळ ८ वाजत आले होते. गर्द झाडी, जंगल, पाऊस त्यात पायाखाली चिखल, दगड, हळूच पायाजवळून जाणारे लहानशे खेकडे, बेडूक,आणि रातकिड्यांचा आवाज सारे काही एकदम थरारक होते.
त्यात आमच्या एकाच्याही मोबाईल ला रेंज नव्हती. अश्यातच आम्ही हळू हळू चालत होतो. एकमेकांच्या आधाराने, तरीही सार्वजन मज्जा करत होते. सर्वच खूप वेगळा अनुभव होता. आता मात्र पुढचे काहीच दिसेनासे झाले. तेव्हा लगेच टोर्च शोधायला सुरुवात झाली पण कसले काय कोणीही टोर्च आणली नव्हती. शेवटी एक मोबाईल मिळाला ज्याला टोर्च होती. त्याच मोबिले च्या उजेडात आम्ही सर्व जन चालत होतो. कोणीही हरवू नये म्हणून आमच्या वाटाड्या प्रतिक च्या सांगण्याप्रमाणे आम्ही २ जनाच्या जोड्या बनवल्या आणि एकमेकांना आधार देत चालू लागलो. प्रतिक च्या माहिती प्रमाणे अजून १ ते १.३० तास लागणार होता पण आम्ही असेच हळू हळू चालत राहिलो असतो तर अजून वेळ लागला असता यात शंका नाही. काही वेळात एके ठिकाणी जीतुच्या मोबाईल ला रेंज मिळाली तेव्हा मग सर्वांनी आपापल्या किंवा दुसर्याच्या मोबाईल वरून घरी फोन करून खुशाली कळवली. खरी गोष्ट कोणीही सांगितली नाही. सांगून सांगून सांगणार काय ? आमची कशी वाट लागली ते.
आता आमचा वेग अजून मंदावला होता दिवसभराचे चालणे यामुळे सर्वांचे पाय दुखत होते. जास्त चालायची ताकत कोणामध्येही नव्हती पण, त्या जंगलात थांबणे सुद्धा जमले नसते म्हणून सर्व हळू हळू चालत होतो.जवळ जवळ आम्ही अर्धा तासाहून जास्त चाललो त्या काळोखात. अचानक आम्हाला दूर कुठूनतरी दोन प्रकाश आमच्या जवळ येताना दिसले. थोड्या जवळ आल्यावर समजले को कोणीतरी दोन माणसे आमच्या दिशेने येत आहेत. सर्वांच्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्यात, ते येणारे नक्की कोण असतील? आणि एवढ्या रात्री ते उलट दिशेने का येत आहेत. काळोखात काहीच समजेनासे झाले होते. शेवटी आम्हीच धीर करून त्यांच्या जवळ गेलो, तेव्हा समजले कि ते गावातलेच आहेत आणि परत घरी चालले आहेत काम उरकून. मग मदतीसाठी त्यांनाच शेवटी आम्ही विचारले. आणि ते लगेच तयार पण झालेत मदत करायला. मग आम्ही त्यांच्या ओळखीने एक टाटा सुमो घेतली आणि त्यातून निघालो. पण निघताना त्यांचे आभार मानूनच निघालो. कारण अजून चालणे झालेच नसते. शेवटी त्या सुमो मध्ये आम्ही १४ जन आणि त्याचा चालक होतो.
मग त्या सुनसान रस्त्यावर सुमो मधून जाताना आमच्या गप्पा रंगायला लागल्यात. त्यात सुमो चा चालक पण सहभागी झाला. तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकूनच आमची पाचावर धारण बसली. तो म्हणाला कि अजून जर काही वेळ तुम्ही चालत राहिला असस्तात तर सकाळ पर्यंत इथेच फिरत राहिला असता कारण रात्री इथे चकवा नावाचा भुताचा प्रकार फिरतो. आणि तुम्ही तर नवीन आहात त्यामुळे पटकन तुम्हाला त्याचा त्रास झाला असता. म्हटले वाचलो आम्ही आणि सुटकेचा निश्वास सोडला. आणि गाडी सुद्धा त्या खडकाळ रस्त्यावरून हळू हळू चालत होती. शेवटी पोहोचलो एकदाचे आम्ही लोणावळा बस स्थानकावर. कोणामध्येही अजून चालायची काय तर उभे राहायची ताकत सुद्धा नव्हती. आणि खूप भूक पण लागली होती, म्हणून मग आम्ही एस. टी. महामंडळ च्या उपहारगृहात गेलो. मग तिथेच सर्वांनी पेट पूजा केली. नन्तर बाहेर येऊन सर्वच जन एस. टी. शोधात होते मुंबई ला जाणारी. परंतु एकही एस. टी. मध्ये बसण्यासाठी जागा नव्हती. आणि उभे राहून ते ४ तास प्रवास करणे कोणालाही शक्य नव्हते. आणि आता ११ वाजून गेले होते. बराच वेळ वाट पाहून सुद्धा एकही बस मिळत नव्हती कि ज्यामध्ये बसायला जागा मिळेल अशी.शेवटी १२ च्या नंतर शेवटी आम्ही ट्रेन ने जायचे ठरवले. तर समजले कि १२.४० ला पहिली ट्रेन आहे मुंबई ला जाणारी. मग काय सर्वांनी फलाटावर झोपून दिले,काही बसले काही उभेच होते. पण आता सर्वांना कधी घरी पोहोचू असे झाले होते. एकदाची ट्रेन आली परंतु तिच्यात खूप गर्दी असल्यामुळे आणि एका रेल्वे अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही ती ट्रेन सोडली. पुढे लगेचच १० मिनिटात दुसरी ट्रेन आली आणि आम्ही सारे तिच्यात बसून मुंबई च्या परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही ठरवल्याप्रमाणे रात्री १० पर्यंत सर्व घरी पोहोचणार होतो, परंतु आता चक्क आम्हाला ४ वाजले दादर ला पोहोचायला.त्यानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन पुढच्या पिकनिक ची तयारी करून सर्व आपापल्या घराकडे वळले.
तर आता आम्ही परत दिवाळीमध्ये जाणार आहोत पिकनिक ला.तर येणार असाल तर त्वरित संपर्क साधावा. माझ्या दूरध्वनीवर.
धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा