रविवार, २४ मार्च, २०१३

अजुनही

अजुनही 

तुझ्या डोळ्यात मी नेहमीच मला हसताना पाहिलेले,
तुझ्या गालावरचे हास्य माझ्या हृदयात घर करून रहिलेले. 

निघून जाताना सुद्धा तू पुन्हा एकदा मागे वळून पाहिलेले,
ती एक नजर पाहून माझे काळीज जळत रहिलेले. 

मनातल्या भावनांनी तेव्हा तुला ओठाआड लपून पाहिलेले,
तुझ्या डोळ्यातले अश्रू  माझ्या सावलीत भिजून रहिलेले. 

बऱ्याच वर्षांनी आज तुला त्याच्या सोबत फिरताना पाहिलेले,
माझे मन तेव्हा बराच वेळ तेथेच रेंगाळत रहिलेले. 

त्याच्या सोबतही तुला आज एकटे एकटे पाहिलेले,
एवढ्या दिवसानंतर हि तुला विसरायचेच रहिलेले. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा